LIVE STREAM

Amaravti GraminCrime NewsLatest News

घरफोडी, मोटर सायकल चोरी व मंदिरातील दानपेटी चोरणारे अटटल चोर जेरबंद

अमरावती ग्रामीण :- स्थानिक गुन्हे शाखेच्या अमरावती ग्रामीण पथकाने मोठ्या प्रमाणावर चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार अटक केले आहेत. या आरोपींनी घरफोडी, मोटर सायकल चोरी तसेच मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरले होते. पोलिसांनी ७ मोटर सायकल आणि साडे 19 ग्रॅम सोने जप्त केले असून दोन्ही संशयित आरोपींना पकडले.

अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मा. श्री. विशाल आंनद यांनी मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मार्गदर्शन केले. यानुसार, २७ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा.चे पथक मोटर सायकल चोरीच्या आरोपींच्या शोधात होते. त्यावेळी गोपनिय माहिती मिळाली की, शिवाजी नगर, चांदुरबाजार येथे दोन सराईत चोर संशयितरित्या मोटर सायकलवर फिरत आहेत. या माहितीवरून पथकाने सापळा लावला आणि दोन्ही संशयित आरोपींना पकडले. आरोपींची ओळख: विक्की उर्फ विकम कृपाप्रसाद नांदने (वय २४ वर्ष, वाकी रायपुर, ता. भातकुली) आणि राहुल चंचल सोनोने (वय २४ वर्ष, रमाबाई आंबेडकर नगर, अमरावती) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांनी ०७ मोटर सायकल चोरी केली असल्याची कबुली दिली. याशिवाय, दोन्ही आरोपींनी चांदुरबाजार आणि परतवाडा येथील घरफोडीतील १९.५ ग्रॅम सोने व नगदी रुपये चोरी केल्याचे सांगितले. आरोपींनी चांदुरबाजार येथील रेल्वे कॉलनीतील शासकीय निवासस्थान आणि कविठा रोडवरील बंद घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व नगदी रुपये चोरले. तसेच, गाडगेनगर व आसेगाव पुर्णा येथील मंदिरातील दानपेटी फोडून नगदी चोरी केली. आरोपींकडून एकूण ०७ मोटर सायकल (किमत अंदाजे ३,५०,०००रु व १९.५ ग्रॅम सोने (किमत अंदाजे १,५०,००० असा एकूण ५००,००० किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना पो. स्टे. चांदुरबाजार यांचे ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्या कबुलीनुसार अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अमरावती ग्रामीण पोलीस अधिक्षक, मा. श्री. विशाल आनंद, अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक, मा. श्री. पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कार्यवाही केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!