LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

बडनेरा येथे प्रतीकात्मक मनुस्मृती ग्रंथांचं दहन

बडनेरा :- बडनेरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती समिती, भारतीय बौद्ध महासभा व संविधान प्रेमी आंबेडकर वादी चळवळीतील संघटनांतर्फे २५डिसेंबर मनुस्मृती निषेध दिन पाळण्यात आला.या प्रसंगी समता चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृतीच्या प्रतिकृती ग्रंथाचे दहन करण्यात आलं.

संपूर्ण मानव जातीत जातियवादी विष पेरून महीलांना अतिशय हीन वागणूक देण्याची संहिता असलेल्या मनू स्मृती ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५डिसेंबर १९२७ साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहन करून दलीत पिडीत समाजा सह महीलांना समानतेची वागणूक देण्याची नवी वाट मोकळी करून दिली.या दिवसाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात संविधानाचा व समानतेचा पुरस्कार करणाऱ्या संघटना तर्फे २५डिसेंबर हा मनूस्मृती निषेध दिवस पाळण्यात येतो याच अनुषंगाने बडनेरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समीती, भारतीय बौद्ध महासभा आठवडी बाजार शाखा बडनेरा व संविधान समर्थक आंबेडकर वादी सामाजिक संघटना व संस्थेच्या वतीने मनुस्मृतीच्या प्रतिकृती चं दहन करण्यात आले.या प्रसंगी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यकर्त्यांनी संविधान अमर रहे, आदी घोषणा दिल्या याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी यासंदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उत्थानासाठी भरीव कार्य केलंय . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला सलाम ताज्या घडामोडींसाठी पहात राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!