LIVE STREAM

Accident NewsLatest NewsMaharashtra

मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू

मुंबई :- अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. काल शुक्रवारी २७ डिसेंबरला घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्र सुटल्याने हा अपघात झाला. कारने दोन मजुरांना उडवलं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याच समजतंय.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. तिच्या गाडीचं नुकसान झालं आहे. आयएएनएसने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कारचा चेंदामेंदा झाल्याचं दिसतंय.

उर्मिला कानेटकर ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ती महेश कोठारे यांची सून असून आदिनाथ कोठारेची पत्नी आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!