नांदेड – नागपूर महामार्गावर ट्रक चालकांनी केले निदर्शनं

नांदेड :- नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी मक्ता या गावाजवळ नव्याने टोल नाका उभारण्यात आलाय या टोलनाक्याजवळ ट्र्क चालकांनी निदर्शनं केले .तोल वसुलीला ट्र्क चालकांचा विरोध आहे रस्ते बांधकाम रखडलं आहे तरी तोल वसुली केली जातेय असं ट्रक चालकाचं म्हणणं आहे. नांदेड जिल्हा ट्रक असोसिएशनने हे आंदोलन केलं.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पारडी मक्ता या गावाजवळ ट्र्क चालकांनी निदर्शनं केली. टोलवसुलीविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. या महामार्गावर मळाकोळी पासून ते बाळापूर पर्यंत 60 किमी अंतरावर तीन टोल नाके निर्माण करण्यात आले आहेत.हे नियमानुसार टोल नाके नाहीत.त्याच बरोबर या महामार्गाचे अनेक ठिकाणी काम रखडले आहे.काम अपूर्ण असताना देखील टोल वसुली करणे चुकीचे आहे.त्यामुळे नांदेडच्या पारडी मक्ता येथील नव्याने उभारण्यात आलेला टोल नाका बंद करावा अशी मागणी नांदेड जिल्हा ट्रक असोसिएशनने केलीय.दरम्यान या टोल नाक्यावर ट्रक असोसिएशनच्या पदाधिकारी आणि ट्रक चालकांनी या मागणीसाठी निदर्शने केली आहेत .घोषणा दिल्या
गावागावात टोलनाके उभारण्यात आले आहेत. ६० किलोमीटर अंतरावर तीन टोलनाके वसुलीसाठी हि बाब वाहनचालकांवर अन्याय करणारी आहे असं ट्र्क चालकाचं म्हणणं आहे. बघूया या संदर्भात पुढे काय निर्णय घेतला जातो ते. पहात रहा सिटी न्यूज.