Amaravti GraminLatest News
अचलपूर तालुक्यात दोन तास बरसला पाऊस

अचलपूर :- हवामान विभागाने वर्तवलेल्या भाकितानुसार अचलपूर तालुक्यात आज सकाळपासून आकाशात वादळाचं वातावरण होतं सकाळ पासून अचानक झालेल्या पावसामुळे सर्वत्र धुके पसरले होते. सकाळी 11 वाजता पासून तर एक वाजेपर्यंत अचलपूर तालुक्यात पाऊस सुरूच होता.
अचलपूर तालुक्यात २८ डिसेम्बरला अकाली पावसाने हजेरी लावली. गुलाबी थंडीच्या काळामध्ये लोकांना छत्री घेऊन घराबाहेर निघावे लागले. तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे तुर प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तब्बल दोन तास पाऊसधारा कोसळत होत्या या पावसाने थन्डीही वाढणार आहे.
२७ २८ डिसेम्बरला पाऊस येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय अकाली पावसाने तूर हरभरा प्रभावित झाल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे.