पोलीस ठाणे हुडकेश्वर डीबी पथकाने उत्कृष्ट डिटेक्शन करून 11 गुन्हे उघडकीस आणले बाबत

नागपूर :- पोलीस ठाणे अपराध क्रमांक 879/24 कलम 305, 331(3) ,331(4),3(5) भारतीय न्याय संहिता दिनांक 15 12 2024 रोजी घडलेल्या घरफोडीचे गुन्ह्यात 251 ग्राम सोन्याचे दागिने किंमत 9,53,000/- तसेच 53000/- रुपये रोख रक्कम असा एकूण 10,06000/- रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता सदर गुन्ह्याची खबर पोलीस ठाणे तपास पथकास भेटताच तात्काळ घटनास्थळी जाऊन आजूबाजूचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता काही संशयित इसम सीसीटीव्ही कॅमेरात आढळून आले त्यांना सीसीटीव्हीचे तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता गुन्हा घडल्याच्या 48 तासाच्या आत आरोपी नामे समीर हुमणे यास गुन्ह्यात वापरलेली बर्गमन गाडी सहा ताब्यात घेण्यात आले तसेच सदर आरोपी मार्फत इतर आरोपींचे नाव निष्पन्न झाली त्यावरून .
गौरव तेनाली व आयुष शेंडे हे मागील दोन महिन्यापासून बाल सुधार गृह कपिल नगर नागपूर येथून फरार होते
त्यांच्यासोबत मन चौरे व आशुतोष रवारे ही नावे निष्पन्न झाले त्यांची माहिती काढून शोध घेतला असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने विक्री करिता अजनी हद्दीत बालाजी नगर येथे जात असल्याचे माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे येथील तपास पथकातील अंमलदार हे दबा धरून बसले असता त्या ठिकाणी आरोपी नामे आशुतोष उर्फ लक्की उर्फ नाकट्या शंकर रवारे व ,गौरव उर्फ तेनाली राजू राऊत व एक विधी संघर्ष बालक दिसताच पोलिसांना पाहून पळू लागले त्यांचा पाठलाग करून पकडले व त्यांना नाव पत्ता विचारले असता तिघांनी आपले नाव पत्ते बरोबर सांगितले लगेच ताब्यात घेऊन आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांचे खिशातून एक सोन्याचे दागिने भरलेली पोटली ज्यामध्ये 171 ग्राम पिवळा धातूचे दागिने 2 चोरी केलेले दुचाकी वाहन एक्टिवा प्रत्येकी किंमत अंदाजे 80 हजार रुपये तसेच चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली एक बर्गमन मोटरसायकल किंमत अंदाजे एक लाख तीस हजार रुपये असा मुद्देमाल मिळून आला त्यांना ताब्यात घेऊन त्यांना इतरत्र केलेल्या गुन्ह्यांबाबत विचारणा केली असता.
त्यांच्याकडून खालील प्रमाणे गुन्हे उघड केस आणले आहे :-
1) पोलीस ठाणे हुडकेश्वर अपराध क्रमांक 896/24 कलम 303(2) बीएनएस
2) पोलीस ठाणे हुडकेश्वर अपराध क्रमांक 821/24 कलम 305(A) 331(3)बीएनएस
3) पोलीस ठाणे हुडकेश्वर अपराध क्रमांक 840/24 कलम 305,331(3)331(4)बीएनएस
4) पोलीस ठाणे एमआयडीसी अपराध क्रमांक 1202/24 कलम 303(2) बीएनएस
5) पोलीस ठाणे रामटेक अपराध क्रमांक 987/24 कलम 305(1),331(4)बीएनएस
6) पोलीस ठाणे रामटेक अपराध क्रमांक 984/24 कलम 305(1) 331(4)बीएनएस
7) पोलीस ठाणे कोराडी अपराध क्रमांक 386/24 कलम 305,331(4),324(4) बीएनएस
8) पोलीस ठाणे कपिल नगर अपराध क्रमांक 410/24 कलम 137(2), 126 बीएनएस
9) पोलीस ठाणे कन्हान अपराध क्रमांक 854/24 कलम 118(1) बीएनएस
10) पोलीस ठाणे कामठी अपराध क्रमांक 446/24 कलम 303(2) बीएनएस
त्यांच्याकडून एकूण 11 गुन्हे उघडकीस आणून एकूण 10,90,339/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.