एका नराधमाने केले दोन चिमुकल्या मुलींचे विनयभंग

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील दिघोरा गावात एका नराधमाने दोन चिमुकल्या मुलींचे विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रवींद्र पसारे ला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र पसारेने घरासमोर खेळत असलेल्या 8 वर्षीय दोन मुलींना खेळणं देतो असे आमिष दाखवून शेजारीच असलेल्या आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी आरोपीने दोन्ही मुलींशी लगट करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे घाबरून एक मुलगी बाहेर पळून गेली. तर दुसरी चिमुकली तिथेच अडकली तिच्या सोबत आरोपीने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. नंतर पीडित मुलीने आपल्या घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितले. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने पीडीतेचा घर गाठून सर्व तक्रार जाणून घेतली आणि त्यांना तक्रार देण्यासाठी हिम्मत दिली. अखेर पीडिता व तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत आरोपी रवींद्र पसारेला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तसंच बलात्कारासारख्या घटना रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पोस्को कायद्यात सुधारणा केल्या आहेत. तरीही लहान मुलांवरील लैंगिग अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत.