LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

‘प्राजक्ता माळीबद्दल जे घडतय…’ अभिनेत्रीसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट

मुंबई :- अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष चर्चेत आली आहे. बीडमधील भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आणि त्यावेळी त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी प्राजक्ता माळी यांचा उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीनेही मुंबईत पत्रकार घेत सुरेश धसांना जोरदार प्रत्युत्तर दिले, शिवाय तिने धसांविरोधात महिला आयोगात तक्रार देखील केली. प्राजक्तावर करुणा मुंडेंनी याआधी गंभीर आरोप केले होके, त्यांनाही प्राजक्ताने नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया समोर आल्या होत्या, आता प्राजक्ताच्या समर्थनार्थ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक-लेखक सचिन गोस्वामी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवर त्यांनी पोस्ट शेअर करत घडल्या प्रकाराचा निषेध केला.

सचिन गोस्वामी यांनी लिहिले की, ‘ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे, क्लेषदायक आहे. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.’ गोस्वामी यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टचे समर्थन करणाऱ्या असंख्य कमेंट आल्या आहेत.

प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद

२८ डिसेंबर रोजी प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. परंतु धस यांनी ‘आपण कोणतीही आक्षेपार्ह बाब बोललेलो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचे’ माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते सुरेश धस ?

धस असे म्हणाले होते की, ‘कोणाला भविष्यात इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचं असेल, तर त्यांनी परळीला या. इथून ज्ञान मिळवा आणि त्याचा प्रचार, प्रसार देशभरात करा. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडे येतात. कोणाला नवीन चित्रपट काढायचा असेल, तर अशा मोठ्या विभूती आहेत, त्यांच्या तारखा कशा मिळतात, त्याचे धडे इथे घेता येतील. प्राजक्ता ताईही आमच्या इथे येतात… इव्हेंटसाठी. आमचा परळी पॅटर्न आहे.’

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!