LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

गप्पा मारत बसणाऱ्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला, घर जाळण्याचा प्रयत्न

आणखी एका धक्कादायक घटनेनं कल्याण हादरलं आहे. कल्याणमधील चिकणघर परिसरात रात्रीच्या वेळी घराबाहेर गप्पा मारत बसणाऱ्या शेजारच्या कुटुंब संतप्त शेजाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. आधी घरावर रॉकेल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर कुऱ्हाडीने वार केल्यानं या घटनेनं सर्वांनाच हादरा बसला आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून दोन लहान मुलांचा ही समावेश आहे. 

चेतन मांडळे असं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असून, कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून दोघांना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान या हल्ल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून, महात्मा फुले पोलीस स्थानकातील तपास यंत्रणांनी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!