AmravatiLatest News
स्थानिक न्यू हायस्कूल मेन येथे शताब्दी समारोहाचा समारोप
स्थानिक न्यू हायस्कूल मेन शाळेचा शताब्दी समारोह समारोपिय कार्यक्रम संपन्न झाला. या ऐतिहासिक समारंभात शाळेच्या स्थापनेपासून ते आजवरच्या शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वांचा आभार व्यक्त केला गेला.
स्थानिक न्यू हायस्कूल मेन शाळेचा शताब्दी वर्षाचा समारोप करणारा कार्यक्रम साजरा केला. या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याची आठवण करून त्यांच्या निधनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्नेह मिलन व सांस्कृतिक कार्यक्रमाची स्थगिती होण्याची घोषणा करण्यात आली. शताब्दी विशेषांक व दिनदर्शिकाच विमोचन समाजसेवक लंप्पीसेठ जजोदिया यांच्या हस्ते करण्यात आल. विशेषांकाचे संपादक श्रीरंग हिर्लेकर व उपसंपादिका संजीवनी पुरोहित यांनी केल. दर्जेदार लिखाण व आकर्षक छपाई असलेला विशेषांक सादर केला कार्यक्रमात शताब्दी विशेषांक व दिनदर्शिका विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात आल्या. यावेळी समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया (लप्पीभैया), एडवोकेट जुगल किशोर गिलडा, .श्रीरंग हिर्लेकर, संजीवनी पुरोहित, दिनेश सूर्यवंशी, माया शिराळकर, रवींद्र खांडेकर, निनाद सोमण उपस्थित होते.
या शताब्दी समारोप कार्यक्रमामध्ये शाळेच्या भूतकाळापासून ते वर्तमानकालातील प्रगतीचा आलेख पाहायला मिळाला. माजी विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती, तसेच अनेक मान्यवरांच्या दिलेल्या शुभेच्छांमुळे या कार्यक्रमाने एक अभूतपूर्व वातावरण निर्माण केले.