सोमवती अमावस्येला पितरांना तर्पण

मार्गशीर्ष अमावस्या सोमवारी आल्याने या अमावस्येला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे सोमवती अमावसेला दान धर्म , तीर्थक्षेत्री स्नान, पितरांना तर्पण केलं जातं. वाठोडा शुक्लेश्वर येथे साडेअकरा ज्योतिर्लिंग उत्तरवाहिनी पूर्णा नदी असल्याने विदर्भाची काशी असलेल्या वाठोड्यामध्ये सोमवती अमावसेला तर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. वाठोडा शुक्लेश्वर येथे सोमवती अमावस्येच्या पर्वावर तर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नदीपात्रात स्नान करून ब्रांह्मणाच्या हस्ते विधिवत तर्पण त्यांनी केलं. पितरांना पिंडदान केलं. पिंडदान केल्याने पितर तृप्त होऊन आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे त्याला अनुसरून मोठ्या संख्येनं नागरिकांनी सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधलाय.
घराण्याच्या कुलदैवताची ज्याप्रमाणे पूजा आराधना करून तिला प्रसन्न ठेवलं जातं त्याचप्रमाणे पितरांनाही तृप्त ठेवावं अशी मान्यता भारतीय परंपरेत आहे. त्यासाठी सोमवती अमावस्या हा महत्वाचा दिवस मानला जातो. पितृपक्षात ज्याप्रमाणे पिंडदान केलं जात त्याचप्रमाणे सोमवती अमावसेलाही केलं जात.