गोवंश ट्रक चा फिल्मी स्टाईल ने पोलिसांचा पाठलाग , नांदगाव पेठ टोल नाका बॅरिकेट्स तोडून पसार

३० डिसेंबर च्या सकाळी अमरावती नागपूर महामार्गावर चित्रपटात जस वाहनाचा सुसाट वेगाने पोलीस पाठलाग करतात तसाच प्रसंग पाहायला मिळाला. एका ट्रक मध्ये गोवंश येत असल्याची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी ट्रक चा पाठलाग केला, अशात ट्रक चालकाने आपला ट्रक सुसाट वेगात चालवून नांदगाव पेठ टोल नाका बॅरिकेट्स तोडून पुन्हा समोर निघाला. यात रहाटगाव टी पॉईंट वर पोलिसांनी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने डिव्हायडर वर ट्रक चढवून पुन्हा समोर निघून गेला. असा फिल्मी स्टाईल बराच वेळ चालवून अखेर ट्र्क लालखंडी जवळ पोलिसांनी ताब्यात घेतला, फिल्मी स्टाईल ने पोलिसांनी ट्रक चा अनेक अंतरापर्यत पाठलाग केला. मात्र ट्रक च्या सुसाट वेगाने सुदैवाने मोठा भीषण अपघात होता होता टळला. एका ट्रक मागे तीन पोलिसांची वाहने सुसाट वेगाने लागली, रस्त्यावर अनेकांनी हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी बघितला, मात्र काही अंतरावर ट्र्क चालकाने चालत्या ट्र्क मधून उडी घेतल्याने तो जखमी झाला आता त्या प्रकरणात पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली आहे.
एखाद्या चित्रपटात जस आरोपींच्या वाहनाचा पोलीस आपल्या वाहनाने सुसाट वेगात पाठलाग करताना आपण पाहिलंत, तसाच प्रसंग सोमवारच्या दिवशी अमरावती शहरातील नांदगाव पेठ ते रहाटगाव रिंग रोडवर अनेकांनी बघितला, नागपूर मार्गे अमरावती येणाऱ्या ट्रक चा गुप्त माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस आपले चारचाकी वाहने घेऊन रस्त्यावर सज्ज झाली. यात ट्रक ला अडविण्याचा प्रयत्न असता ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक चालवीत निघून गेला. अशातच तीन पोलिसांच्या वाहनाने ट्रकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली, समोर नांदगाव पेठ टोल नाका येताच पुन्हा वेग वाढवून ट्र्क ने बॅरिकेट्स तोडून समोर निघून गेला. पुढे रहाटगाव नवसारी रिंग रोडवर ट्राफिक जाम झाल्याने ट्रक थांबेल असं दिसताना मात्र असफल ठरले पुन्हा ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने डिव्हायडर वर ट्र्क चढवून रिंग रोड मार्गाने सुसाट वेगात ट्र्क पळविला. पोलिसांनी पुन्हा पाठलाग केला, नांदगाव पेठ पोलिसांनी वायरलेस वर तात्काळ माहिती दिली. इकडे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले सह नागपुरी गेट गाडगे नगर पोलीस ट्रक पकडण्यास सज्ज झाले त्यांनी सुद्धा ट्रक चा पाठलाग केला. पोलीस पकडणार म्हणून ट्रक चालकाने लालखडी जवळ चालत्या ट्रक मधून उडी घेतली अशी माहिती पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी फोनवर स्पष्ट केली ट्रक मधून आधीच दोघांनी पळ काढला दरम्यान पोलिसांनी जखमी चालकाला ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ट्रक मध्ये कोणता अवैध मुद्देमाल होता. गोवंश होता कि अन्य अवैध माल होता याच्या तपासात आता पोलीस लागले आहे.