आकस्मिक उपचारासाठी सीपीआर ट्रैनिंग
मागील तेरा वर्षांपासून महिलांच्या वेलनेस व फिटनेस करिता अमरावती मधे कार्यरत असलेल्या खुशालीज ग्रेस एरोबिक्स फिटनेस सेंटरच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आकस्मिक वैद्यकीय परिस्थितीत अथवा हृदय विकाराच्या झटक्या वर प्रथमोपचार म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी सीपीआर-CPR कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सीपीआर-CPR म्हणजेच (कार्डीओ पल्मनरी रेसुसिटेशन) या अत्यंत महत्त्वाचे विषयावरील कार्यशाळेत, डॉ. संपदा संदीप पाटील यांनि तज्ञ म्हणून मार्गदर्शन केलं. आपल्या आयुष्यात ऑक्सिजनला किती महत्त्व आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली की आपला जीव गुदमरू लागतो. अशीच स्थिती जर दीर्घकाळ राहिली तर जीवही जाऊ शकतो. नाका-तोंडात पाणी गेल्यानं, एकदम दाट धुरामध्ये अडकल्यास किंवा हार्ट अटॅक आल्यास ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असते. ही प्रक्रिया नेमकी काय आहे? त्यामुळे लोकांचा जीव कसा वाचू शकतो, याबाबत डॉ. संपदा पाटील यांनी सरल व सुलभरित्या उपस्थित ग्रेस एरोबिक्सच्या सदस्यांशी संवाद साधत, या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत सीपीआर (CPR) असं म्हणतात, असे सांगून विस्तृत माहिती दिली
सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते जिचा वापर करून अनेकांचा जीव वाचवता येऊ शकतो, डॉ. संपदा पाटील यांनी उपस्थित सर्वांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिल. . या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशाळेस ग्रेस एरोबिक्सच्या पन्नास महिला सदस्या उपस्थित होत्या. या यशस्वी आयोजनासाठी सर्व उपस्थितांनी संचालिका खुशाली भोंडे यांचे आभार मानले. धकाधकीच्या काळात कोणाला कोणत्यावेळी कसा त्रास होईल हे सांगता येत नाही. अशावेळी प्रथमोपचाराची माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी असा कार्यशाळा आवश्यक असतात . सीपीआर कार्यशाळा काळाची गरज आहे.