महाराष्ट्र स्टेट एथेलेटिक चॅंम्पीयनशीपमध्ये सोनाली अहिर ने पटकविले प्रथम क्रमांक

दिनांक २७डिसेंबर,२०२४ ते दिनांक २९ डिसेंबर,२०२४ रोजी नागपुर येथे झालेल्या 45thमहाराष्ट्र स्टेट एथेलेटिक चॅंम्पीयनशीप आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अमरावती महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी सोनाली अहिर हिने 45th महाराष्ट्र स्टेट एथेलेटिक चॅंम्पीयनशीपमध्ये सहभाग घेतला होता.महाराष्ट्र स्टेट एथेलेटिक चॅंम्पीयनशीपमध्ये सोनाली अहिर हिने भालाफेक , थाळीफेक व हॅमर फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या यशाचे श्रेय अमरावती एथेलेटिक्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री तडस, श्री नागपुरकर पशुवैद्यकीय विभागाचे पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिन बोंन्द्रे, सहाय्यक पशुधन निरीक्षक गुणसागर गवई तसेच तिचे आई, वडील तसेच कुटुंब यांना दिले आहे. या स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेचे व अमरावती शहराचे नाव रोशन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.