१ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती चे

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट सक्तीचं करण्यात आलंय. १ जानेवारी २०२५ पासून दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट वापरणं बंधनकारक रहाणार आहे ३१ डिसेम्बरपासून हेल्मेट वापराबाबत वाहतूक शाखेनं जनजागृती केली.
अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक शाखेच्या वतीने आज 31 डिसेंबर चे औचित्य साधून दुचाकी स्वारांमध्ये पंचवटी चौक येथे हेल्मेट विषयी जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे वेशभूषा केलेले प्रत्यक्ष यमराज रस्त्यावर येऊन दुचाकी चालकांना संदेश देत होते की हेल्मेट वापरा नाहीतर मी तयारच आहे. यावेळी मंगला बोडके, भाग्यश्री परदेसी, अमोल ढेगेकर, शोभा बेलसरे. प्रशांत वाघ. उपनिरीक्षक प्रलय वाघमारे आदी वाहतूक कर्मचारी उपस्थित होते. अपघातांचं वाढतं प्रमाण पहाता हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. गेल्या महिण्यापर्यंत पोलिसांनी हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली आता १ जानेवारीपासून मात्र हेल्मेट सक्तीचं करण्यात आलंय. वर्षाच्या अखेरीस हेल्मेट वापरा सुरक्षित रहा असा संदेश वाहतूक शाखेनं दिलाय.