सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायती बंद
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या त्येच्या निषेधार्थ राज्यातील ४० ग्राम पंचायती ३ दिवस बंद ठेवण्यात येत आहेत यामध्ये भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निंदनीय कृत्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. एका कर्त्यव्यनिष्ठ सरपंचाचा अशा प्रकारे अंत केल्याच्या विरोधात राज्यभरातील ग्राम पंचायती ३ दिवस बंद ठेवून निषेध केला जातोय भातकुली तालुक्यातील खोलापूर,वाठोडा शुक्लेश्वर यांच्यासह ग्रामपंचायत सोमवार पासून 3 दिवस बंद. रहाणार आहेत. – संतोष देशमुखच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी..करण्यात येतेय. सरपंच संतोष देशमुख याना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले मोठमोठे आंदोलन करण्यात आलेत आता राज्यभरातील ग्रामपंचायती बंद ठेवून निषेध व्यक्त केला जातोय