वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक

पाचपावली पोलीस ठाण्याने वाहन चोरी आणि घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्यांच्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून वाहन आणि घरफोडीच्या गुन्ह्यात वापरलेली मुददेमाल जप्त केली गेली आहे. पाचपावली पोलीसांनी अट्टल गुन्हेगाराला अटक केलीय, जो वाहन चोरी आणि घरफोडी सारख्या गुन्ह्यांमध्ये सामील होता. आरोपी शाहरूख खान हनीफ खान याला चंद्रपूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले गेले. त्याच्यावर वाहन चोरी व घरफोडीचे आरोप होते. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 1,47,900 रुपयांचा मुददेमाल जप्त केला. आरोपीची चौकशी केली असता त्याने इतरही गुन्हे केल्याचे कबूल दिली. त्याच्या कडून एक काळ्या रंगाची मोपेड गाडी, कॉलेज बॅग आणि अन्य मुददेमाल जप्त करण्यात आलाय. या आरोपीवर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हया आधी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये फरार होता आणि त्याला आता अटक केली गेली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती पाचपावली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी सिटी न्यूज नागपूरच्या प्रतिनिदिला दिली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या ताब्यात आलेल्या या अट्टल गुन्हेगाराने गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होण्याची कबुली दिली आहे. त्याच्या कडून मोठ्या प्रमाणावर मुददेमालही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती मिळवली असून तपास सुरू आहे.