मेयो हॉस्पिटल परिसरात दुचाकी चोरी केली
नागपूरच्या मेयो हॉस्पिटल परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना नागपूर व छिंदवाडा पोलिसांनी अटक केली. ४० चोरीच्या गाड्यांचा शोध लावला आहे. या चोरी करणाऱ्या चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. चला, तर जाणून घेऊया या गुन्ह्याची सविस्तर माहिती.”
सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये फिर्यादीने सांगितले की, मेयो हॉस्पिटल परिसरात त्यांची हिरो H.F DELUXE गाडी चोरीला गेली. यापूर्वी देखील, मेयो हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये मागील दोन वर्षांपासून वारंवार दुचाकी चोरी होत होत्या, त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. काही इसम फुटेज मध्ये वारंवार दिसत असल्याने हेच आरोपी असावे, त्यांची ओळख न पटल्याने ते दुस-या राज्याचे किवा दुस-या जिल्हाचे असणार आहे अशा दाट संशय व्यक्त करण्यात आला. २४ डिसेंबर २०२४ रोजी छिंदवाडा येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या ताब्यातून मेयो हॉस्पिटल परिसरातील चोरी झालेल्या तीन दुचाकी जप्त केल्या. अधिक तपासात आरोपींनी नागपुर व मध्यप्रदेश येथील हॉस्पीटल ला टारगेट करून तेथुन मोटरसाईकल चोरी करून त्या गाडीचे नंबर प्लेट काढून, वाहन मध्यप्रदेश येथील छिंदवाडा जिल्हातिल ग्रामीण भागात विक्री करित होते. पोलिसांनी सखोल तपास करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात रोहित गुणाराम चंद्रपूरी वर्ष 34, छिंदवाडा, नीरज शिवकुमार नगवंशी वर्ष 21, छिंदवाडा, रोहित बंसीलाल नागले वर्ष 25, बैतुल, अमित कैलास अहेके, वर्ष 19, छिंदवाडा आणि दिनेश उर्फ दीपक कुमार कुमरे वर्ष 19, छिंदवाडा असे आरोपींचे नाव असून , त्यांच्याकडून एकूण ४० गाड्या अंदाजे किंमत 12 लाख 90 हजार जप्त करण्यात आल्या आहे. अशी माहिती पत्रकारांशी बोलताना नागपूर पोलिस उपयुक्त महेक स्वामी यांनी दिली नागपूर आणि मध्यप्रदेशातील चार आरोपींनी मेयो हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी केली आणि या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन ४० चोरीच्या गाड्यांचा शोध घेतला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे.