महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा बलात्कार

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. निफाड पोलिस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. तर, पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार झाल्याचेदेखील समोर आले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पीडित तरुणीवर वर्षभराच्या कालावधीत विविध ठिकाणी अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात येत आहे. पीडित तरुणी आणि संशयित आरोपी यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे दोघांनी विविध ठिकाणी अत्याचार करण्यात आला.
निफाड पोलिस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा घडल्यानं निफाड पोलिसांनी आडगाव पोलिसांकडे गुन्हा केला वर्ग केला होता. आडगाव पोलिसांनी एकाला अटक केलीये तर चार संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहेत. आडगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.