AmravatiLatest News
नवसारी वरून चांगापूर जाणारा रस्त्याचे काम अपूर्ण, नागरिकांची तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी
अमरावती येथील नवसारी वरून चांगापूर जाणारा रस्त्याचा काम हे अद्यापही पूर्ण झालेला नाही हा मार्ग राज्य महामार्ग असून एकेरी मार्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे रोज या ठिकाणी अपघात घडत आहे. राजपूत डाव्या समोरील हा रस्ता परतवाडा मार्गे धारणी जातो. हा रस्ता डांबरीकरण करून अतिशय चांगला तयार करण्यात आला होता तरीसुद्धा हा रस्ता खोदून येथे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे कोट्यावधी रुपयाचे बिल कृत्य दिसत आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून तात्काळ हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करत आहेत.