अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराच्या अभ्यास वर्गाच्या प्रदर्शनी कक्षाचे चंद्रकुमार जाजोदिया यांच्या हस्ते उद्घाटन
“अ.भा.वि.प. कार्यकर्त्यांचे राष्ट्र निर्माण मध्ये खूप मोठे योगदान !. विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये आपलं लक्ष ठरवलं पाहिजे त्या लक्षाला अनुसरून आपल्या जीवनाचे उद्दिष्ट हे पूर्ण केलं पाहिजे जीवनात लक्ष ठेवणं फार महत्त्वाचे आहे” चंद्रकुमार जाजोदिया यांचे प्रतिपादन
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर द्वारा 27, 28 व 29 डिसेंबर रोजी अभ्यास वर्ग कोंडेश्वर बडनेरा येथे आयोजित करण्यात आला होता . अभ्यास वर्गाची सुरुवात 27 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले स्वर्गीय माधव जी डेयनकर प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन समाजसेवक व प्रसिद्ध उद्योजक श्री चंद्रकुमारजी जाजोदिया यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी महानगर अध्यक्ष प्रा. क्षितिज शाह महानगर मंत्री रिद्धेश देशमुख उपस्थित होते व तसेच विविध महाविद्यालयातील 120 विद्यार्थी अभ्यास वर्गाला उपस्थित होते.