Latest NewsNagpur
गणेशपेठ परिसरात गंगा अपार्टमेंटमधील पोर्च कोसळल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील गंगा अपार्टमेंटमधील दुकानाचा पोर्च अचानक कोसळला. या दुर्घटनेत अजय अशोकराव इंगळे हे गंभीरपणे जखमी झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोर्च कोसळल्यामुळे बिल्डिंगला मोठे नुकसान झाले .ही घटना अपार्टमेंटच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून प्रशासन आणि आपत्कालीन सेवा विभागाने घटनास्थळी तातडीने मदत कार्य सुरू केले. अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही, मात्र प्रशासनाने या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. याबाबत गणेशपेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छीन्द्र पंडित यांनी दिली.
गंगा अपार्टमेंटमधील दुर्दैवी अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असून तपास प्रक्रिया सुरू आहे.