विद्यापीठाची हिवाळी-2024 एम.ई. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग सत्र-1 ची परीक्षा स्थगित

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी-2024 लेखी एम.ई. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग (इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड पॉवर) (सी.बी.सी.एस.) सत्र-1 व एम.ई. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग (इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम) (सी.बी.सी.एस.) सेमि.-1 लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. परंतु विद्या विभागाकडून प्राप्त सुधारित परीक्षा योजनांचे अनुषंगाने आय.ई.ई.पी.05 रिसर्च मेथॉडॉलॉजी अॅन्ड आय.पी.आर. तसेच आय.ई.पी.एस.05 रिसर्च मेथॉडॉलॉजी अॅन्ड आय.पी.आर. या विषयास सुधारित परीक्षा योजनेत अंतर्गत गुण दर्शविल्यामुळे उपरोक्त दोन्ही विषयांची दि. 04 जानेवारी, 2025 रोजी नियोजित असलेली परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात आले आहे. यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये, प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्रांना परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना कळवायचे आहे. तरी विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.