नागपूर पोलिसांनी विधिसंघर्षीत बालकास जेरबंद करीत चोरीस गेलेला 82,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला

नागपूर शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याने एक मोठी कारवाई करण्यात आली,. विधिसंघर्षीत बालकाने घरफोडी करत 82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला होता. त्याला पोलिसांनी तांत्रिक माध्यमांद्वारे आणि गुप्तबातमीद्वारे पकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे पाचपावली येथे एक चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार , फिर्यादी आपल्या मुलीसोबत परिवारीक कार्यक्रमासाठी दुसऱ्या ठिकाणी गेले असता, अज्ञात चोरट्याने घराचा मागील दरवाज्याचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि आलमारीतील सोनं, चांदीचे दागिने आणि नगदी असा एकुण 82,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून, तांत्रिक माध्यमांद्वारे आणि गुप्तबातमीद्वारे माहिती मिळवून त्या विधि संघर्षग्रस्त बालकाला पकडले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले दागिने आणि नगदी रक्कम हस्तगत करण्यात आली. आरोपीच्या पालकांना सूचना देऊन त्यांच्या उपस्थितीत विधिसंघर्षग्रस्त बालकास जेरबंद करण्यात आले. नागपूर पोलिसांच्या उत्कृष्ट कार्यवाहीमुळे चोरीस गेलेला मुद्देमाल लवकरच ताब्यात घेण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली. हा यशस्वी तपास आणि कठोर कारवाई समाजाच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे.