Latest NewsNagpur
नागपूरच्या ‘फर्जी कॅफे’मध्ये पोलिसांचा फर्जीवाडा! दोन पोलिस कर्मचारी निलंबित
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'फर्जी कॅफे'चे संचालक आणि एका महिलेच्या वादानंतर पोलिसांनी संचालकाकडून ५ लाखांची लाच मागितली, पैसे न मिळाल्यावर पोलिस ठाण्यात त्याची बेदम धुलाई केली. या घटनेनंतर दोन पोलिस कर्मचारी निलंबित करण्यात आल्याने पोलिस विभागात खळबळ माजली आहे.
प्रकरण आहे ३१ डिसेंबरच्या रात्रीचे, जेव्हा नागपूरमधील 'फर्जी कॅफे'मध्ये एक महिला आणि कॅफे संचालक यांच्यात वाद झाला. महिलेनं कॅफे संचालकावर मारहाणीची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी काही वेगळाच दृषटिकोन घेतला. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या काही पोलिसांनी या प्रकरणाचा निकाल काढण्यासाठी कॅफे संचालकाकडून ५ लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, पैसे न मिळाल्यामुळे,पोलिसांनी कॅफे संचालकाला ठाण्यातच बेदम मारहाण केल्याचा आरोप संचालकाच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणानंतर कॅफे संचालकाने पोलिसांवर तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. प्रकरण उघड झाल्यानंतर संबंधित दोन पोलिस कर्मचारी निलंबित करण्यात आले असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित पोलिस कर्मचार्यांवर कारवाई तर करण्यात आली आहे, मात्र प्रश्न असा आहे की, पोलिस प्रशासनाच्या हद्दीत भ्रष्टाचाराच्या अजून किती अशा प्रकारच्या घटना होणार आहेत?