LIVE STREAM

AmravatiLatest News

नववर्षाच्या स्वागतासाठी रामस्नेही संप्रदायाचे व्यसनमुक्ती अभियान, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती

मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात हुल्लडबाजी किंवा दारू पिऊन धिंगाणा न घालता सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने नववर्षाची सुरुवात करावी, असा महत्त्वपूर्ण संदेश देत रामस्नेही संप्रदायाने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात युवांना व्यसनमुक्तीची शपथ घेत, सकारात्मक सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील लालखेड येथे रामस्नेही संप्रदायाच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यातील विविध जिल्ह्यांतील तसेच गुजरात आणि राजस्थानमधील युवक आणि त्यांच्या पालकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रामस्नेही युवक मंडळाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात हिवरा येथील प्रमुख केंद्रावर व्यसनमुक्ती अभियान राबवले जात आहे. यावर्षी, लालखेड येथे हे अभियान पहिल्यांदाच राबवण्यात आले. युवकांना व्यसनमुक्तीसाठी प्रेरित करणाऱ्या या अभियानात अमरावती, यवतमाळ, वाशिम, नांदेड, सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यांतील युवक सहभागी झाले. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि तहसीलदार पूजा मातोडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत समाजाला अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं सांगितलं.
रामस्नेही संप्रदायाच्या वतीने घेतलेल्या या व्यसनमुक्ती अभियानाने नववर्षाच्या स्वागतासाठी एक सकारात्मक दिशा दिली आहे. अशा प्रकारे समाजातील प्रत्येकाने नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्त व सकारात्मक ध्येयाने करावी, असाच संदेश या कार्यक्रमातून दिला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!