City CrimeInternational NewsLatest News
तृणमूलच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या; ही भीषण घटना सीसीटीव्हीत कैद

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक दुलाल सरकार यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात धक्कादायक दृश्य कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले दृश्य अतिशय थरारक आहे. फुटेज मध्ये दुलाल दुकानाबाहेर उभा असताना दोन तरुण तोंडावर मफलर बांधून आले, त्यांच्या हातात बंदुका होत्या. हे पाहून दुलालने दुकानाच्या आत पळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही तरुनानीही दुकानात घुसून दुलाल सरकार यांच्यावर गोळीबार केला. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक दुलाल सरकार यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात धक्कादायक दृश्य कैद झाले आहे. दुलालच्या डोक्यात गोळी लागली. त्यावेळी दुकानात इतर कर्मचारीही उपस्थित होते. अचानक घडलेल्या या घटनेने ते स्तब्ध झाले होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देताच पोलिस घटना स्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून, आरोपीनविरुद्ध हत्येचा गुन्हा निंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.