प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा मार्फत पोलीस ठाणे पारडी नागपूर शहरातील प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगणाऱ्या दोन इसमान विरुद्ध कारवाई करण्यात आली. आरोपी रतन रामकिशन सिंग आणि कपिल कुलदीप सिंह दोन्ही वर्ष 19, राहणार पारडी. या दोघांकडे प्रतिबंधित नायलॉन मंचा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असता आरोपींकडून मोनो केटीसीचे लेबल असलेला 39 नग चक्री तसेच मोनोकाइट फायटर असे लेबल असलेला प्रतिबंधित मांजाच्या 64 नग चक्री, एक होंडा शाईन गाडी, रेडमी मोबाईल आणि एप्पल मोबाइल असा एकूण दोन लाख 86 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीनविरुद्ध कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 सह कलम 223 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे पारडी यांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची पोलीस प्रशासनाच्या वतीने प्राप्त झाली.