Latest NewsVidarbh Samachar
टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना घडले आर्चीच्या बछड्यांचे दर्शन

नववर्षानिमित्त यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात पर्यटक गर्दी करत आहेत, पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन होत असून, आर्ची या वाघिणीचे नर आणि मादा बछडे सध्या मुक्त विहार करीत असल्याने पर्यटकांना त्यांनी भुरळ घातली आहे. माथनी गेटवरून सफारीमध्ये नाशिक येथील पर्यटक माहिका शहा आणि स्थानिक मार्गदर्शक योगेश ठोंबरे यांनी ह्या दोन्ही बछड्याचा व्हिडिओ चित्रित केला आहे. टिपेश्वर मध्ये 25 हुन अधिक वाघांची नोंद आहे. येथील वाघ नुकताच 500 किलोमीटर अंतर कापून धाराशिव जिल्ह्यात पोहोचला आहे, अभयारण्यात वाघांची संख्या जास्त आणि त्यांचे क्षेत्र कमी असल्याने ते अधिवासाच्या शोधात बाहेर पडत आहे.