मनपा मराठी उच्च प्राथ शाळा क्र 18 येथे सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरी

स्थानिक प्रविण नगर स्थित महानगर पालिका शाळा क्र 18 येथे अद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर धोत्रे हे होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. शाळेतील मुलींनी सावित्रीबाई यांची वेशभूषा केली होती.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून त्यांचा जीवनपट उलगडला.
काहींनी मी सावित्री बोलतेय ही नाटिका सादर केली. अश्या अनेक बाबी यावेळी सादर करण्यात आल्या. मुख्याध्यापक सुधीर धोत्रे यांनी विद्यार्थ्यांचे कालागुणांबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु वैशाली महाजन यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद मंजू वानखडे,योगिता हेडाऊ, प्रिती भोकरे,रहिम खान, शुभांगी उंबरकर,वैशाली केने, कांचन सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.