LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही या विहीरीचे पाणी

  भव्य गड किल्ले हे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. याचप्रकारे महाराष्ट्राला अनेक ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. अशीच एक ऐतिहासीक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. या वास्तू म्हणजे एक विहीर आहे. ही विहीर सर्वसधारण विहीरीप्रमाणे नसून या 110 फूट खोल विहीरीत आहे भव्य राजवाडा बांधण्यात आलेला आहे. जाणून घेऊया या विहीरी विषयी.   
  सातारा जिल्ह्यातील लिंब या गावामध्ये जवळपास ही अनोखी विहीर आहे. लिंब हे गाव साताऱ्यापासून 16 किमी आणि पुण्यापासून 19 किमी अंतरावर आहे. 300 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही ऐतिहासिक विहीर ही बारा मोटेची विहीर या नावाने ओळखली जाते.  या विहिरीत चक्क एक महाल बांधण्यात आला. या विहीरीचे एणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 300 वर्षात ही विहीर कधीही आटली नाही.   छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या पत्नी वीरूबाई यांच्या देखरेखीखाली या विहिरीचे बाधकाम पूर्ण झाले होते. 1719 ते 1724  या कालावधीत छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी वीरुबाई भोसले यांनी ही विहीर बांधली होती.  110 फूट खोल आणि 50 फूट व्यास असलेली ही विहीर आमराईला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आली. 3300 आंब्यांच्या झाडांना यातून पाणीपुरवठा करण्यासाठी ही विहीर खोदण्यात आली होती. या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी 12 मोटा लावल्या जात. यामुळे ही विहीर बारा मोटेची विहीर या नावाने ओळखली जाते. 
  या विहीरीची वेगळी ओळख म्हणजे या विहीर एक भव्य राजवाडा आहे. या विहीरीचं सर्व बांधकाम हेमाडपंती आहे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यात आलेला नाही. जमिनीखालील महालात ही विहीर बांधलेली आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर करण्यात आली आहे. महालात विविध चित्रे कोरण्यात आली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे येथे पहायला मिळतात. हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले आहे. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. बारा मोटीची इतिहास कालीन विहिर म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमूना आहे. 
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!