नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात गुन्हेगारीचे सावट कल्पना नगरात चेनस्नेचिंग पोलिसांना भामट्याने आव्हान
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अमरावती शहरात चेन स्नेचिंग च्या घटनेची गाडगे नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, महिला घरी जात असताना दोन अज्ञात भामटे दुचाकीवर येऊन तब्बल १५ ग्राम वजनाची ९० हजार किमतीचे मंगळसूत्र हिसकावून दोघांनी दुचाकी ने पोबारा झाले. हि घटना ३ जानेवारीच्या दिवशी घडली. घडलेल्या घटनेने अमरावती शहरात पुन्हा चेन स्नेचर सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. अमरावती शहरात ३ जानेवारीच्या दिवशी नवसारी चौकातील कल्पना नगरात चेन स्नॅचिंग ची घटना घडली यात महिलेच्या गळ्यातील ९० हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोन भामटे दुचाकी ने पसार झाले अशात आता नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात चेन स्नेचर शहरात सक्रिय होणे हे मात्र अमरावती शहर पोलिसांना चांगले च आव्हान झाले आहे. २०२४ वर्षी अमरावती शहरात काही ठिकाणी चेन स्नॅचिंग च्या घटना घडल्या. आता मात्र २०२५ वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरात चेन स्नेचिंग ची घटना घडल्याने अमरावती शहर पोलिसांना अज्ञात भामट्याने चांगलेच आव्हान दिले आहे. गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नवसारी चौकातील कल्पना नगरात ३ जानेवारीच्या दिवशी हि घटना घडली, फिर्यादी महिला स्टेशनरी साहित्य खरेदी करून आपल्या घराकडे पायी निघाल्या, या दरम्यान त्याच्या मागावर असलेल्या दोघांनी दुचाकी ने येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून दुचाकी ने रफूचक्कर झाले, महिलेने आरडा ओरड केली मात्र चोरटे तात्काळ पसार झाले ,१५ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असल्याची तक्रार फिर्यादी महिलेने गाडगे नगर पोलिसात केली, यात पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३०४ ( २) अंतगर्त गुन्हा दाखल करण्यात आला, एकीकडे नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कौटुंबिक वादात पती ने पत्नीचा खून केल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली तर दुसरीकडे चेन स्नॅचिंग च्या घटनेची सुद्धा पहिल्याच आठवड्यात नोंद झाली आहे. आता शहरात पुन्हा चेन स्नेचर सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.