रात्रभर बसला प्रेयसीच्या घराबाहेर, सकाळी घेतला थेट टोकाचा निर्णय, हैराण करणारी घटना

एक अतिशय धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी एक युवक रात्रभर थंडीत तिच्या घराबाहेर बसला. सकाळी झाली की, त्याने आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील आहे. 15 वर्षांचा मुलगा दोन मुले असलेल्या महिलेच्या प्रेमात पडला. तो महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र, रात्रभर बसूनही ती त्याला भेटली नाहीतर त्याने थेट आत्महत्येसारखे पाऊल उचलले.
ही घटना गाझीपूरच्या दिलदारनगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव आशुतोष राय आहे. तो चंदौली जिल्ह्यातील काकरीत गावचा रहिवासी होता. आशुतोष हा अशा महिलेच्या प्रेमात पडला होता, जी अगोदरच विवाहित होती आणि तिला दोन मुले देखील होती, कुटुंबियांनी समजून तो महिलेला सोडत नव्हता.
आशुतोषच्या कुटुंबियांनी पोलिस चौकशीत सांगितले की, दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरू असायचे. ते सतत फोनवर बोलायचे. दोघांचे हे नाते वादांनी घेरले होते. याप्रकरणी पंचायतही झाली. अनेकांनी मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणाचेही अजिबात ऐकत नव्हता. महिलेच्या प्रेमात त्याला चांगले वाईट असे काहीच कळत नव्हते. नववर्षाच्या रात्री घरच्यांनी थांबवूनही तो प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. पूर्ण रात्रभर तिच्या घराबाहेर थांबूनही ती भेटली नसल्याने त्याने आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच आशुतोषचे कुटुंबियही घटनास्थळी पोहोचले. आता आशुतोषच्या घरच्यांचे म्हणणे आहे की, ज्यावेळी आशुतोषची माहिती त्यांना मिळाली, त्यावेळी ते महिलेच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या मुलाच्या तोंडातून रक्त येत होते. यामुळे कुटुंबियांना संशय आहे की, महिलेच्या कुटुंबियांनीच त्याची हत्या केली. हत्येचा संशय व्यक्त करत कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करताना दिसत आहेत.