LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

अळणगाव येथे श्री संत मारोती महाराज व लालनशेष महाराज जयंती महोत्सव जल्लोषात साजरा

 

   तालुक्यातील अळणगाव येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत मारोती महाराज व लालनशेष महाराज जयंती महोत्सव निमित्त 4 जानेवारी रोजी सकाळी गोपी महाराज यांच्या हस्ते तीर्थ स्थापना करण्यात आली होती. व संध्याकाळी पुंडलिक नाथ महाराज यांच्या हस्ते महापूजा व होम हवन यज्ञ करण्यात आला तसेच रात्री सप्त खंजरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज यांचे दणदणीत कीर्तन झाले या कीर्तनाचा बहुसंख्य भक्तांनी तसेच गावकऱ्यांनी लाभ घेतला. 5 जानेवारी रोजी सकाळी गावातून पालखी मिरवणूक यात्रा काढण्यात आली. मिरवणुकीच्या स्वागत साठी गावातील प्रत्येक घरासमोर श्री चा फोटो व आकर्षित रांगोळी काढण्यात आली होती. या शोभायात्रेत संत गुणवंत महाराज निर्वाण भूमी इंर्विन चौक अमरावती येथील पालखीचे विशेष आकर्षण होते 
    पालखीचे मंदिरात आगमन होताच गुणवंत महाराज, लाल शेष महाराज व मारोती महाराज यांची मोठ्या जल्लोषात आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली महाप्रसादाचा बहुसंखभक्तांनी लाभ घेतला.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!