LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

मुंबईतला सर्वात मोठा सीआरझेड घोटाळा; जमिनीचे 102 सरकारी नकाशे बनावट

मुंबईतला सर्वात मोठा घोटाळा समोर आलाय. सीआरझेड घोटाळ्यात जमिनीचे 102 सरकारी नकाशे बनावट आढळले आहेत. शेतजमिनीवर बांधलेली अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी सातबारा आणि सिटीसर्वेत बेकायदेशीर फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एसआयटीने चौघांना अटक केली असून 18 सरकारी कर्मचाऱ्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन शिपाई आणि दोन दलालांचा समावेश आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पश्चिम उपनगरातील मालाड, मढ आयलंड येथील कोस्टल रेग्सुलेशन झोन (सीआरझेड)चे बोगस सरकारी नकाशे तयार करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भूमी अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करुन हा घोटाळा केल्याचे उच्च न्यायालयाच्या आणि दर्शनात आले.
एसआयटीच्या माध्यमातून तपास
यानंतर न्यायालयाच्या न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.
चौघांना अटक, 18 जणांची चौकशी
याप्रकरणी गुन्हे शाखेने चौघांना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या मध्ये दोन भू अभिलेख कार्यालयातील शिपाई आणि दोन दलालांचा समावेश आहे तर याप्रकरणी आता 18 सरकारी कर्मचार्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!