LIVE STREAM

Latest NewsNagpur

पोलीस स्थापना सप्ताहाच्या अनुषंगाने जप्त मुद्देमाल मुळ मालकांना केला परत

पोलीस स्थापना सप्ताहाच्या अनुषंगाने नागपूर शहरात वाढते गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेत, नागपूर पोलिसांनी पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक आणि सायबर पथक तयार करून घडलेल्या प्रकरणाचा छडा लावला. हस्तगत केलेल्या मुद्देमाल पोलिसानी मूल मालकांना परत केला.
पोलीस स्थापना सप्ताहाच्या अनुषंगाने, नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांनी मागील एक वर्षात चोऱ्या, घरफोडी, वाहन चोरी आणि मोबाईल चोरीच्या प्रकरणांचा तपास करून त्यांचा छडा लावला, पोलिसांनी यामध्ये एकूण ५४ लाख 34 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ४ वाहने आणि १७७ मोबाईलचा समावेश आहे. सदरच्या सर्व कारवाया पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मंगळवार रोजी नागपूर परिमंडल ५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या नेतृत्वात कळमना, नविन कामठी, जुनी कामठी, पारडी, यशोधरानगर, जरीपटका, कपीलनगर आणि कोराडी या पोलीस ठाण्यांच्या पथकांनी हा मुद्देमाल मुळ मालकांना परत केला.
नागपूर शहरातील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आणि नागरिकांच्या चोरीचे मुद्देमाल परत केले. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!