मुलं होत नाही म्हणून दाम्पत्य त्रस्त,पत्नी ने लग्नाची नेसली साडी, अन दोघांनी घेतला गळफास

मुलं होत नसल्याने नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका दाम्पत्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपल्याची धक्कादायक घटना समोर येत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी पती-पत्नीने आधी सुसाईड व्हिडिओ तयार करून आपल्या मोबाईलच्या स्टेटस वर ठेवला होता तोच व्हिडिओ बघून नातेवाईकांनी घराकडे धाव घेतल्याने प्रकरण उघडकीस आले. या घटनेने परिसरात शोक कळा पसरली आहे.
संसारात प्रत्येकांच्या जीवनात चढ उतार आणि अनेक समस्या निर्माण होतच असते त्यातून पर्याय काढणे हा एक महत्त्वाचा भाग असतो मात्र हल्ली अनेक दाम्पत्य सुखी संसारात समस्या निर्माण झाल्याने अगदी टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवन यात्रा संपवित असल्याच्या अनेक घटना घडत आहेत.. अशीच एक धक्कादायक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. मूल होत नसल्याने आणि परिस्थितीला कंटाळून चक्क एका दाम्पत्याने घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी पती पत्नीने मोबाईलवर सुसाईड व्हिडिओ बनविला. त्या व्हिडिओ मध्ये मी जात आहेत सर्वांनी काळजी घ्यावी आपापल्या कुटुंबात सर्वांनी सुखी राहा असा भावनिक व्हिडिओ पत्नीने तयार केला होता. पत्नीने आत्महत्या करण्यापूर्वी लग्नाची साडी परिधान केली होती. पती-पत्नीने व्हिडिओ तयार करून आपल्या मोबाईलच्या स्टेटस वर तो व्हिडिओ ठेवला. आणि लगेच काही क्षणात पती-पत्नी फासावर अटकून दोघांनी आपली जीवन यात्रा संपवली. नातेवाईकांनी मोबाईल स्टेटस वर तो व्हिडिओ बघून घराकडे धाव घेतली. नागपूर शहरातील जरीपटका पोलिसांना सुद्धा नातेवाईकनी माहिती दिल्याने पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. जरी फटका पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मार्टिन नगर येथे राहणारे 54 वर्षीय जॉईन मॉर्टीन असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव समोर येत आहे तर 45वर्षीय हेरी मॉर्टिन असे आत्महत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहेत.. पोलिसांनी घरातून मोबाईल जप्त केला त्यातच दोघांनी आत्महत्या पूर्वी तयार केलेला सुसाईड व्हिडिओ आढळून आला.. घरात पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर सुद्धा आढळून आला ज्यामध्ये पती पत्नीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दांपत्याचे 26 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.. चार-पाच वर्षापासून पतीला काम धंदा नव्हता तो अशिक्षित आहेत. मुलं बाळ होत नसल्याने दोघेही चिंताग्रस्त होते तसेच परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहेत.
परिस्थितीला कंटाळून टोकाचा निर्णय घेऊन नागपूर शहरातील पती-पत्नीने सुसाईड केले. त्याला कारण म्हणजे मूल होत नसल्याची चिंता, सोबतच परिस्थितीला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीने लग्नाची साडी परिधान केली होती अशा घटनेने नागपूर शहरातील मार्टिन नगरात संवेदना व्यक्त केली जात आहेत.