LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

दादर फुल मार्केटमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने! सरवणकर-सावंतांमध्ये तुफान राडा

  दादरमध्ये पुन्हा एकदा दोन शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. अतिशय क्षुल्लक करणाहून शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंतांचा वाद झाला आहे. दादर पश्चिमेला फुल मार्केटमध्ये एक बॅनर लावला असून त्यावरून दोन्ही गटाचे राजकारण सुरू झाले आहे. आमदार सावंत यांनी हा बॅनर काढायला सांगितल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर समाधान सरवणकर फुलमार्केट मध्ये पोहचले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारू लागले. दोघांनीही एकमेकांवर आरोप केले आहेत.

जाब विचारला
मुंबईमधील पालिका निवडणुकीआधी दादरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. दादरमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि विद्यमान आमदार महेश सावंत आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. दादरमधील फुल मंडईतील बँनर काढल्यानं समाधान सरवणकर चांगलेच संतापले आहेत. महापालिकेच्या अधिका-याला समाधान सरवणकरांनी यासंदर्भात जाब विचारला आहे.

“कोण हप्ते घेते माहित नाही पण…”
हप्ते घेणा-या आमदाराचं ऐकून तुम्ही कारवाई का करता? असा सवाल समाधान सरवणकर यांनी विचारला आहे. तसेच हप्ते घेण्यासाठी महेश सावंत असं का करतो? असा सवाल समाधान सरवणकरांनी विचारला. आमदारांच्या तक्रारीनंतर बँनर काढल्याचं अधिका-याचं म्हणणं आहे. या प्रकरणावर महेश सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवातना, “आमदार पुत्र बालिश आहे. ज्याला राजकारणाचा र सुद्धा माहित नाही. बापाच्या पुण्याईवर नगरसेवक झाला आहे,” असा टोला लगावला आहे. तसेच पुढे बोलताना, “कोण हप्ते घेते माहित नाही पण स्वतःची इतकी घरं काही उगाच झाली का?” असा खोचक प्रश्न सावंतांनी विचारला आहे.

लोकांनी त्यांना घरी बसवल्यामुळे…
“त्यावेळी (समाधान सरवणकर) 150 का 200 मतांनी निवडून आला होता. आज व्याजासकट तो विजय सामान्य माणसाला दिला आहे. कुठे काय बोलावं हे कळत नाही. हा राजकारणाचा भाग नव्हता. ही तक्रार माझी नाही तर मार्केट अधिकाऱ्यांनी ती तक्रार केली होती. या फुल मार्केटच्या कमिटीमध्ये राजकीय बॅनर लावू नका हे पहिलेच सांगितले होते. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते लोक करत आहेत,” असंही महेश सावंत म्हणालेत. “लोकांनी त्यांना घरी बसवल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तीन टर्म आमदार राहून सुद्धा शिवाजी पार्कचे प्रदूषण किंवा साफ करता यांना आलं नाही,” असा टोलाही सावंतांनी लगावला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!