Latest NewsNagpur
तहसील पोलिसांनी छापा टाकून १० लाख रुपयांचा नायलॉन मांजा केला जप्त

तहसील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी अमोल श्यामराव मौनदेकर यांनी मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा मागवलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांचे विशेष पथक तयार करून छापा टाकण्यात आला. या छापेमारीत एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला तसेच आरोपीला ताब्यात घेतले. संबंधित कार्यवाहीची माहिती तहसील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांनी माहिती दिली
नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण बघता पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न केल्या जात आहे आणि या प्रयत्नांचा एक भाग ही प्रतिबंधित नायलॉन मांज्यावरील कारवाई आहे. प्रशासनाच्या वतीने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय.