मोर्शी- अमरावती मार्गावरील अवैध वाहतुकीवर मेरी मर्जी चा प्रकार, कोण घालणार प्रतिबंध

शहरातील गाडगे नगर पंचवटी चौकात अनेक वर्षांपासून अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार अनेक नागरीकच काय पोलीस सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. कोणतेही वाहन येऊन रस्त्यावर वाहने उभे करून नागपूर वरुड च्या मार्गाने अवैध प्रवाशाची वाहतूक केली जात आहे. अशीच अवैध वाहतूक वेलकम पॉईंट पर्यत दिवस रात्र सुरूच असते. मात्र याच अवैध वाहतुकीवर संबंधित गाडगे नगर पोलीस आणि वाहतूक पोलीस कारवाई करण्यास नजरअंदाज करीत असलयाचे दिसून येत आहे. अखेर याचीच तक्रार तक्रार प्राप्त झाल्याने माजी आमदार ऍड यशोमती ठाकूर यांनी आता कारवाई करण्याकरिता आवाज उठविला आहे.
मोर्शी अमरावती मार्गावर असलेल्या पंचवटी चौकात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. अनेक चारचाकी वाहन चालक मनमानी करून नागपूर वरुड मार्गाने प्रवासी वाहतूक करतात, यावर मात्र अद्यापही मोठी धडक कारवाई आर टी ओ विभागा सह वाहतूक पोलिसांनी केली नसल्याचे कधी आठवत नाही. हाच चौक आता खाजगी वाहनाचे खाजगी स्थानक झाले तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पंचवटी चौकातील पेट्रोल पंप पासून तर पीडीएमसी रुग्णालय प्रवेश द्वार पर्यत खाजगी वाहनाच्या रांगा सकाळ संध्याकाळ च्या दरम्यान दिसून येते अशाने सर्वसामान्य प्रवाश्याच्या जीविताला धोका वाढल्याची भीती आता निर्माण होत आहे. यावर कारवाई करण्यात संबंधित पोलीस वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने मात्र चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे. कोणाचे खिसे होत आहे गरम अशी चर्चा सुद्धा आता होताना दिसून येत आहे. अशाने अवैध वाहतुकीची समस्या वाघोली रहिवासी नामदेव सुखदेव खडसे यांनी माजी राज्यमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या कडे केल्याने वाहतुकीला प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
पंचवटी चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीला स्थानिक पोलिसांचे अभय असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. विशेष म्हणजे खडसे यांनी स्वतःची गाडी इथूनच सुरू केली असता त्यांना विरोध करण्यात आला. परंतु इतर वाहनाना मात्र पोलिस आशिर्वादाणाने सर्व सुरळीत सुरू आहे याचा अर्थ काय? असा सवाल खडसे यांनी केला आहे, याबाबत सखोल चौकशी होऊन उचित कार्यवाही व्हावी अशी मागणी माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. या समस्येवर आमच्या प्रतिनिधीने आर टी ओ अधिकारी सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही तर वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांना विचारले असता त्यांनी या आधी कारवाई केली तेथे कोणालाच प्रवाशी वाहनांची परवानगी आपण दिली नाही. अवैध वाहतूक केल्याचे दिसताच धडक कारवाई करणार माहिती विल्हेकर यांनी स्पष्ट केली. आता यशोमती ठाकूर यांच्या तक्रारी नंतर वाहतूक पोलीस विभाग आर टि ओ विभाग संबंधित पोलीस धडक कारवाई करणार का हे आता पाहावं लागणार आहे
अमरावती शहरात वाहतूक पोलिसांनी नुकतीच वाहतूक सुरक्षा सप्ताह यशस्वी राबविला. मात्र गाडगे नगर पंचवटी चौकात सुरु असलेल्या अवैध पार्किंग, अवैध वाहतूक व्यवस्थेवर गाडगे नगर आणि वाहतूक पोलीस विभागाला धडक कारवाई मोहीम राबविल्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे आता गाडगे नगर पंचवटी चौकातील अवैध वाहतूक विरोधात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. आता या मागणीवर वाहतूक पोलीस यंत्रणा कारवाई करेल का हे आता पाहायला मिळणार आहे.