तिरुपती बालाजी मंदिरात भीषण घटना, चेंगरार्चेगरीत 6 भविकांचा अंत
तिरुमला येथे वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन वाटप सुरू होण्याआधी भीषण घटना घडली आहे. टोकन वाटपावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. टोकन घेण्यासाठी भविकांनी मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली अशात गुदमरून भविकांचा मृत्यू झाला, तर अनेक भविकाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांच्या आस्थेचे धार्मिक मंदिर समजल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिरात भीषण दुर्घटना घडली. तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाचे टोकन घेण्याच्या गडबडीत अचानक चेंगराचेंगरी निर्माण होऊन 6 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तिरुपती मंदिरात गुरुवारी पहाटे वैकुंठ द्वार दर्शन टोकन वाटप सुरू करण्यात आलं अशात बुधवारी संध्याकाळपासूनच भाविकांनी गर्दी झाली होती. परंतु यादरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि यात 6 भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. काही ना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या दुर्घटनेत 6 भविकांचा गुदमरून मृत्यू झाल्याने भाविकात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच मंदिरात दर्शनाचे टोकन वाटप करतांना भविकांची झुंबड निर्माण होऊन एकमेकांच्या अंगावर पडले. अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भविकांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.