LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

येवल्यात ११ वर्षाच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला; चिमुरडीची मृत्यूशी झुंज

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मोकाट जनावरांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ११ वर्षीय परी संतोष करवर या चिमुरडीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात परी गंभीर जखमी झाली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. परीला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या गंभीर जखमा पाहता पुढील उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांसह शहरांमध्ये मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र, प्रशासनाकडून यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
येवल्यातील या घटनेने मोकाट जनावरांच्या प्रश्नाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली नाही तर अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!