एसआरपीएफमध्ये पोलीस वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ यांच्यातर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त दि. २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून नागरिक, शालेय विद्यार्थी, खेळाडू तसेच पोलीस कुटुंबियाकरीता विविध उपक्रम घेण्यात आले. यात पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, तसेच पोलीस पाल्यांकरीता मॅरेथॉन स्पर्धा, अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स यांच्या संयुक्तरित्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री मॅरेथॉन स्पर्धा, संपूर्ण पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सामुहीक योगा, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांकरीता निबंध, चित्रकला स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता शस्त्र प्रर्दशन, तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्राथमिक प्रशिक्षण व मार्गदर्शन, आदिवासी बहुल मेळघाट विभाग येथील गरजू नागरिकांकरीता आरोग्य व रोगनिदान शिबिर, विविध खेळांचे आयोजन, पोलीस कुटुंबियाकरीता आकाश दर्शन आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यासाठी समादेशक सुशांत सिंग, सहायक समादेशक सुरेश कराळे, बलराम रोठे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे नियोजन पोलीस निरीक्षक अजय काळसर्प आणि पोलीस निरिक्षक राशिद शेख यांनी केले,