नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने वाहन चोरटे घेतले ताब्यात
मध्यप्रदेश राज्यातील जबरी चोरी सह इतर 14गुन्ह्यात मध्यप्रदेश पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला अखेर नागपूर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस पथकांनी सापळा रचून बेडया ठोकल्या. नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाने आरोपीला ट्रॅव्हल्स ने पळून जाताना ताब्यात घेतले.
मध्यप्रदेश राज्यातील पोलीस स्टेशनं गांधीनगर, हबीबगंज शहापुरा, अयोध्या नगर पिपलानी, कोहेफिजा, बैरागढ कमला नगर हनुमानगंज गोविंदपुरा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या.. यासोबतच मध्य प्रदेश राज्यातील निषेध पुरा येथे घर कायद्याचे मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण करणारा अट्टल 27वर्षीय आरोपी भोपाल मध्य प्रदेश येथे राहणारा सालिक उर्फ रिहान इराणी पुत्र शौकत हा मध्य प्रदेश राज्यातून पसार झाला होता. मध्य प्रदेश सरकार ने आरोपी विरुद्ध 50 हजार रुपयाचे बक्षीस सुद्धा जाहीर केले होते. अखेर हाच आरोपी नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस पथकाच्या जाळ्यात अडकला. नागपूर पोलिसांना आरोपी हंसा ट्रॅव्हल्स ने भोपाल येथून हैदराबाद कडे जात आहेत अशी गुप्त माहिती मिळताच 10 जानेवारीला आरोपीला कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅव्हल्स मधून डब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला लखनऊ उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्स चे पोलीस निरीक्षक प्रमोद कुमार वर्मा यांच्या ताब्यात देण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशाने नागपूर शहर सह पोलीस उप आयुक्त राहुल माकणीकर सहायक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात नागपूर गुन्हे शाखा युनिट 5चे पोलीस निरीक्षक राहुल शिरे पोलीस कर्मचारी चंद्रशेखर गौतम रुपेश नानवटकर राजू सिंग राठोड अनिस खान प्रवीण भगत सुनील यादव देवचंद थोटे रोशन तांदूळकर सुधीर तिवारी सोबतच सायबर युनिट पथकाने केली.
मध्यप्रदेश पोलिसांना हवा असलेला अट्टल आरोपी नागपूर शहरात दिसून आल्याने नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस पथकांनी सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध मध्य प्रदेश पोलिसांनी 50 हजार रुपयाचे बक्षीस सुद्धा जाहीर केले होते. 14 गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीला अखेर नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी शोधून काढले.