जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
रविवार दिनांक १२ जानेवारी,२०२५ रोजी जिजाऊ मॉ साहेब जयंती निमित्य आर.टी.ओ. ऑफीस जवळील राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब यांचे पुतळ्याला हारार्पण महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी उपस्थित होते.
जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती निमित्य सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांचे हस्ते जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करतांना त्यांचे जीवनचरित्र (अल्प परिचय) दर्शविणारा फलक लावण्याच्या सुचना शासनांनी निर्गमित केले असून जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र (अल्प परिचय) दर्शविणारा फलक लावण्यात आले. यावेळी प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, प्रशांत पाचकवडे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्य प्रशांत नगर येथील बगीच्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचे पुतळ्याला हार्रापण उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक बंडुभाऊ हिवसे, शाळेचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी, एन.एस.एस.चे विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, स्थानिक नागरीक, उद्यान विभागाचे कर्मचारी रामधन जाधव, अनिल जाधव, पंकज राठोड उपस्थित होते.