सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारी रोजी काढण्यात येणार सकल समाज बांधवांच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चा

मोर्चात देशमुख कुटुंबीय,छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे,आमदार सुरेश धस,संदीप श्रीसागर, नरेंद्र पाटील, ज्योती मोटे नानासाहेब जावळे पाटील राहणार उपस्थित.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भव्य जन आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात आज मराठा बांधवांची नांदेड शहरात बैठक पार पडलीय. हा मोर्चा 18 जानेवारी रोजी काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी राजे, नानासाहेब पाटील,खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीप श्रीसागर, नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. या मोर्चाची सुरूवात नांदेड शहरातील आयटीआय पासून होणार असून जिल्हाधिकार्यालयावर हा मोर्चा धडकणार आल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलीय.