Nagpur
टू व्हीलर धारकांसाठी हँडलवर मेटॉलिक रोड लावण्याचा प्रशासनाचा निर्णय

संक्रांतीच्या आणि पतंगोत्सवाच्या पर्वावर नागपूर शहरात वाहतूक शाखेच्या वतीने खास खबरदारी घेण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने टू व्हीलर धारकांसाठी हँडलवर यु शेपमध्ये मेटॉलिक रॉड लावण्यात आले आहे, जेणेकरून रस्त्यावरील मांजाने कोणत्याही प्रकारच्या अपघाताचा सामना करावा लागणार नाही. वाहन धारकांना हेल्मेट, गळ्याभोवती स्कार्फ आणि चष्मा वापरण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. वाहतूक शाखेच्या डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 जानेवारी रोजी शहरातील उड्डाणपूल बारा तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत नागरिकांना वळण रस्त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व उपाययोजना रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील आदेश लवकरच जारी करण्यात येतील अशी माहिती सहाय्य पोलीस आयुक्त माधुरी बावीस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सध्या नायलॉन मांज्यामुळे वाढलेले अपघात लक्षात घेता, प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी अत्यंत महत्त्वाची आहे. सामान्य नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.