पन्नालालनगर नाला दुरुस्तीची कार्यवाही प्रलंबित

स्थानिक पन्नालालनगर मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने खचला असून नागरिकांचा येण्याजाण्याचा पुलाजवळील पन्नालालनगर शॉर्टकट रस्ता बंद झाला आहे शेकडो नागरिक , महिला , जेष्ठ नागरीक यांना जाण्यायेण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे हा रस्ता नाल्याच्या बाजूने खचला असून मोठे खड्डे त्याला पडले आहे त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली कोसळुन पडु शकतो व एखादी मोठी दुर्घटना होउन जीवितहानी होण्याची शक्यता आहे नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठिल नागरिकांना अक्षरश्या जिव मुठीत घेवून राहावे लागते मि मनपा स्थायी समिती सभापती (सन :- 2016-17 ) असतांना शहरातील सर्व 16 मोठे नाले आणी 18 उपनाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षाभिंती बांधन्यात याव्या यासाठी 375 करोड 67 लाख रुपयाचा D.P.R तयार केला होता यामध्ये स्व.वसंतराव नाईक नगर ते श्रीनाथवाडी मोठा नाला , मारोतीनगर नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम , श्रीनाथ वाडी पुलाचे बांधकाम सोबतच राजापेठ ते पन्नालालनगर ते एच.व्हि.पि.एम पर्यंतचा 1700 मीटर लांबीचा नाला खर्च 44 करोड रुपये याचा सुध्दा समावेश होता सुरक्षा भिंती नसल्यामुळे नाला दोन्ही बाजूने खचत चालला आहे नाल्याकाठील राहणारे पवन बागडी , रामेश्वर रौरासे , राठी , शेंडे , गहलोत यांच्या घराच्या मागच्या बाजूच्या भिंती नाल्याच्या पाण्यामुळे पडल्या आहे दोन महिन्या अगोदर पन्नालाल नगर पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता पूर्ण खचला असून मोठे खड्डे पडले आहे हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती करावी या मागनीसाठी मनपाला निवेदन दिले होते पन काहीच कार्यवाही झाली नव्हती त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होउन जीवितहानी होण्या अगोदर दुरुस्ती करावी यासाठी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी पन्नालाल नगर नाल्यात उतरून आक्रमक आंदोलन केले नाल्यात पाणी अत्यंत खराब असून काही ठिकाणी नाल्यात मोठे खड्डे असल्याने पाण्याच्या अंदाज येत नाही सापांची संख्या नाल्यात खूप आहे तरी सुद्धा खचलेल्या रस्तामुळे कोणती जीवितहानी होउ नये आणी नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे याकरिता माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले होते मिलिंद बांबल यांच्या आक्रमक आंदोलनाची दखल घेवून मनपाने दुरुस्तीसाठी 10 लाख रुपये मंजूर केले टेंडर झाले पन अजून पर्यंत कामाला सुरुवात झाली नाही रस्ता पूर्ण खचला असून केव्हाही दुर्घटना होउन जीवितहानी होण्याची शक्यता आहे दुरुस्ती करणे अती आवश्यक असल्याने माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी मनपा आयुक्त मा. सचिन कलंत्रे साहेब यांची भेट घेवून पन्नालालनगर नाला दुरुस्ती , शहरातील साफसफाई ,जन्म व मृत्यू नोंदणी विभागा मध्ये सुधारणा करून नागरिकांना सुविधा करून देणे आदी विषयांवर निवेदन देवून सविस्तर चर्चा केली मनपा आयुक्त सचिन कलंत्रे साहेब यांनी तात्काळ शहर अभियंता रवींद्र पवार यांना फोन लावून कामाचे टेंडर झाले असून तातडीने अग्रिमेंट करून कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले शहर अभियंता यांनी 10 दिवसात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले यावेळी माजी स्थायीसमिती सभापती मिलिंद बांबल , राजेश गोफणे , नरेंद्र नांदूरकर ,सचिन आलटकर , निरज खेरडे , पंजाबराव बुढाळकर , संजय सापधरे , शुभम बांबल , रामेश्वर रौरासे आदी मान्यवर उपस्थित होते