मनपा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली ट्रान्सफोर्ट नगर, चौधरी चौक, मालवीय चौक व अग्निशमन केंद्राची पाहणी

महानगरपालिका उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी आज दिनांक १३ जानेवारी,२०२५ रोजी दैनंदिन साफ सफाई कामाच्या अनुषंगाने ट्रान्सफोर्ट नगर, चौधरी चौक, मालवीय चौक, अग्निशमन केंद्राची पाहणी केली. या पाहणी दरम्यान उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी सर्व व्यवसायिकांना सांगितले की, कचरा परिसर स्वच्छ करुन त्वरित तो कचरा घंटागाडीत टाकण्याबाबत निर्देश दिले. मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्यांकडे कच-यासाठी डबा असलाच पाहिजे, असे निर्देश देऊन मार्केट जवळील कंटेनर वाहतूक व्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असताच कामा नयेत, असा कडक इशारा उपायुक्तांनी दिल्या. हयगय नकोच, अन्यथा कारवाई साफ सफाईच्या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशी तंबी देण्यात आली.
सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी होत असलेली अस्वच्छता साफ करावी असे निर्देश उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी संबंधीत प्रभागाच्या स्वास्थ निरीक्षकांना दिल्या.
या पाहणी दरम्यान उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी चौधरी चौक परिसरातील फुटपाथवर बसलेले फुल वाल्यांची तपासणी केली. यावेळी उपायुक्तांनी सदर फुलवाल्यांची जागा हटविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले.
या पाहणी दरम्यान मनपा उपायुक्तांनी मुख्य अग्निशमन केंद्राला भेट दिली. यावेळी मनपा उपायुक्तांनी सदर विभागाची पाहणी करुन हजेरी रजिस्टरची तपासणी केली. महानगरपालिका उपायुक्तांनी सदर विभागातील कामाकाजाचा आढावा घेतला व सदर कामाबाबत उपायुक्तांनी निर्देशित केले.
या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे उपस्थित होते.