मनपा आ. सचिन कलंत्रे यांनी केली ऑक्सिजन पार्क जवळील परिसर, चित्रा चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार, परकोट, गांधी चौक, दस्तुरनगर परिसरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी मंगळवार दि.१४ जानेवारी,२०२५ रोजी सकाळी शहरातील ऑक्सिजन पार्क जवळील परिसर, चित्रा चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार, परकोट, गांधी चौक, दस्तुरनगर परिसरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ची महानगरपालिका क्षेत्रात अंमलबजावणी होत आहे. सार्वजनिक स्वच्छतेवर महानगरपालिकेने भर दिला आहे. आता अमरावती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे स्वच्छतेकडे किती लक्ष आहे. या स्वच्छता अभियानाची महानगरपालिका क्षेत्रात योग्यरीतीने अंमलबजावणी होतेय की नाही, स्वच्छतेचे काम खरोखर चांगले होतेय का हे पाहण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी नुकतीच पाहणी केली. या मिशनअंतर्गत महानगरपालिकेकडून योग्य पद्धतीने स्वच्छतेचे कामे होणे गरजेचे आहे. या शहरातील विविध परिसराची महानगरपालिका आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी सुरू आहे. स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेत त्यांनी हजेरी बुकांची तपासणी केली. स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार व घंटागाडी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत स्वच्छता करतांना रस्त्याचे साईड पट्टी स्वच्छता करण्यात यावी अशी सक्त सूचना त्यांनी केली. कचरा परिसर स्वच्छ करुन त्वरित तो कचरा घंटागाडीत टाकण्याबाबत निर्देश दिले. मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्यांकडे कच-यासाठी डबा असलाच पाहिजे तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असताच कामा नयेत, असा कडक इशारा आयुक्तांनी दिला. हयगय नकोच, अन्यथा कारवाई साफ सफाईच्या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशी तंबी यावेळी त्यांनी दिली. संपुर्ण परिसर, नाले साफ झाले पाहिजेत, रोड साईडला गवत दिसायला नको, दुभाजक स्वच्छ असावेत. जे हातगाडीवाले कचरा टाकतात त्या हातगाडयांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार, स्वच्छतेबद्दलची परिस्थिती सुधारण्यासाठी महानगरपालिका वेगवेगळी पावले उचलत आहे. सदर परिसरातील स्वच्छतेची पाहणी आयुक्तांनी संपूर्ण परिसरात फिरून केली. सदर परिसरातील स्वच्छतेबाबत अधिक दक्ष राहून परिसर स्वच्छतेची कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी दुकानदारांना ओला व सुका कच-यासाठी डस्टबिन ठेवण्याबाबत सक्त निर्देश आयुक्तांनी दिले.
यावेळी सहाय्यक आयुक्त दिप्ती गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजेश राठोड, राजु डिक्याव, स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते.